आयडियल प्रशालेत संपन्न झाली “श्रावणधारा” सुगम संगीत स्पर्धा.

आमदार नितेश राणे यांच्या हस्थे झाले उदघाट्न.
ज्ञानदा शिक्षण संस्था आणि डॉ. राजअहमद हुसेनशहा पटेल चॅरिटेबल ट्रस्ट हरकुळ बुद्रुक चे भव्य आयोजन.
कणकवली/मयुर ठाकूर.
ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड जूनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स या प्रशालेत “श्रावणधारा” सुगम संगीत स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये सुमारे 130 स्पर्धक सहभागी झाले होते.त्यामध्ये 45 स्पर्धकांची निवड करण्यात आली आणि ही अंतिम फेरी नुकतीच आयडियल प्रशालेत संपन्न झाली. आणि या “श्रावणधारा” सुगम संगीत स्पर्धेचे उद्घाटन कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ श्री. विद्याधर टायशेटे तसेच कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल,उपाध्यक्ष श्री मोहन सावंत,सचिव श्री हरिभाऊ भिसे आयडियलच्या मुख्याध्यापिका श्री सौ अर्चना देसाई तसेच मिलिंद मेस्त्री आणि विविध मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली असून जिल्हाभरातील विविध ठिकाणहून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये,
प्रथम गट 5 वी ते 8 वी
प्रथम क्रमांक-ध्रुव गोसावी
द्वितीय क्रमांक – अनुष्का आपटे
तृतीय क्रमांक – प्रांजली कानेटकर
उत्तेजनार्थ प्रथम – प्राजक्ता ठाकूरदेसाई
उत्तेजनार्थ द्वितीय – काव्या गवंडळकर
उत्तेजनार्थ तृतीय – अनुष्का सुतार.
मोठा गट 9 वी ते 12 वी
प्रथम क्रमांक- स्वरांगी गोगटे
द्वितीय क्रमांक – श्रुती सावंत
तृतीय क्रमांक – हर्ष बोंडाळे
उत्तेजनार्थ प्रथम – युगांता मेस्त्री
उत्तेजनार्थ द्वितीय – मृणाल मेस्त्री
उत्तेजनार्थ तृतीय – शर्वाणी करंबेळकर
मोठा गट 9 वी ते 12 वी
प्रथम क्रमांक- स्वरांगी गोगटे
द्वितीय क्रमांक – श्रुती सावंत
तृतीय क्रमांक – हर्ष बोंडाळे
उत्तेजनार्थ प्रथम – युगांता मेस्त्री
उत्तेजनार्थ द्वितीय – मृणाल मेस्त्री
उत्तेजनार्थ तृतीय – शर्वाणी करंबेळकर.
असे विजयी स्पर्धक आहेत. यां सदेव विजेत्या स्पर्धाकांचे आयोजकांच्या वातीने अभिनंदन होत असून सर्व स्थरातून कौतुक होत आहॆ.