मराठा आमदार, खासदारानी खांद्याला खांदा लावून निषेध मोर्चा सहभागी व्हावे!

कणकवली मराठा मंडळ हॉलमधील नियोजन बैठकीत समाज बांधवांचे मत
मराठा समाजाच्या वतीने कणकवलीत उद्या जालना येथील लाठी हल्ल्या प्रकरणी सरकार विरोधात निषेध मोर्चा
जालना येथील मराठा समाज बांधवांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ला करणाऱ्या सरकारच्या विरोधात उद्या सोमवारी कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक गावनिहाय मराठा समाज बांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा. अशा सूचना आमदार वैभव नाईक व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिल्या. याकरिताच्या नियोजनाची आज महत्त्वपूर्ण बैठक येथील मराठा मंडळ हॉलला पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना योगेश सावंत यांनी मराठा समाजाचे आमदार, खासदार यांनी समाजासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तर हा मोर्चा कोणताही पक्षीय स्वरूप देण्यात आलेला नाही. मराठा समाज म्हणून हा मोर्चा काढण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका. जिल्हाधिकाऱ्यांनी 144 कलम लागू केले या घटनेचाही आम्ही निषेध करतो असे सतीश सावंत यांनी याप्रसंगी सांगितले. तर या नियोजन बैठकीत प्रत्येक गावातून मराठा समाज बांधव मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रत्येकावर जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी समाज बांधवांना मोर्चात सहभागी होता यावे याकरिता वाहनांची व्यवस्था करणे, या अनुषंगाने आमदार वैभव नाईक व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी मार्गदर्शन केले. उद्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा प्रांत कार्यालयाच्या दिशेने जाईल तेथे प्रांताधिकार्यांना निवेदन दिले जाईल असे श्री सावंत यांनी सांगितले. या नियोजन बैठकीला आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, आबू पटेल, नीलम सावंत, माधवी दळवी, योगेश सावंत, रुपेश आमडोसकर, प्रथमेश सावंत, सखाराम सपकाळ, अजय सावंत, बाळा सावंत, समीर परब, धनंजय सावंत, संतोष परब, ललित घाडीगांवकर, प्रशांत राणे, राजू राणे, सुशांत दळवी, सोमा गायकवाड, राजू राणे, व्यंकटेश वारंग, उत्तम लोके, दीपेश परब, आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली