शिक्षक दिनी शिक्षण मंत्र्यांच्या कार्यलयासमोरच होणार ‘बोंबाबोंब’ आंदोलन

युवासेनेच्या वतीने आयोजन

प्रतिनिधी । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळेत अजूनपर्यंत शिक्षक न दिल्याने शिक्षण विभागाची, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तसेच स्थानिक डीएडच्या बेरोजगारांच वाटोळं करून सगळ्यांचीच बोंबाबोंब केल्याबद्दल नामदार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडे शिक्षकदिनी म्हणजेच ५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता युवासेनेच्या वतीनेबोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे. युवासेना कोकण सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत हे *बोंबाबोंब आंदोलन होणार आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाच्या समोर होणाऱ्या या आंदोलनात बेरोजगार युवक युवती, डिएडचे बेरोजगारानी यांनी तसेच युवासेना पदाधिकारी, युवासैनिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे. असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख कुडाळयोगेश दत्ताराम धुरी यांनी केले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!