महादेव गुरव यांचे निधन

लोरे गावचे रहिवासी, जेष्ठ नागरिक, माजी सरपंच ,लोरे विकास संस्थेचे माजी चेअरमन, वाघेरी- लोरे हायस्कूलचे संस्थापक संचालक, गाव पातळीवर सामाजिक आणि धार्मिक कामात योगदान देऊन सदैव अग्रेसर असणारे, गुरव समाजातील आदर्श व्यक्तिमत्व- महादेव तुकाराम गुरव तथा आप्पा (८४वर्षे) यांचे काल त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
कणकवली प्रतिनिधी