हुमरमळा (वालावल) येथे ११ हजार १११ ची दहीहंडी

शिवसेना, युवासेना तर्फे दहीहंडी उत्सव २०२३ चे आयोजन
आमदार वैभव नाईक यांचा होणार विशेष सत्कार
गुणवंत विद्यार्थी, उद्योजक यांचा देखील होणार गौरव
प्रतिनिधी । कुडाळ : हुमरमळा (वालावल) येथे गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेना, युवासेना आयोजित दहीहंडी उत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आमदार वैभव नाईक यांचा गावातर्फे गौरव करण्यात येणार आहे. तसेच दहावी,बारावी,शिष्यवृत्ती परीक्षा आणि विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. गावातच छोटे छोटे उद्योग उभारून रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योजकांचा देखील गौरव करण्यात येणार आहे. अशी माहिती सरपंच सौ अर्चना बंगे यांनी दिली.
हुमरमळा वालावल गावातील विकास हा खासदार विनायक राऊत, कार्यसम्राट आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या सहकार्याने होत असताना खास राऊत यांनी मोबाईल टॉवरची मोठी समस्या कायमस्वरूपी दुर केली. याशिवाय हुमरमळा वालावल नविन ग्रामपंचायत बांधकाम त्यांच्याच माध्यमातून सुरु करत आहोत,असे सौ. बंगे यान सांगितले. दहीहंडी निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि पंचक्रोशी मर्यादित अकरा हजार एकशे अकरा रुपयांची दहीहंडी असणार आहे. सलामी देणा-या गोविंदा पथकांना विशेष मानधन देण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना पंचायत समिती विभाग प्रमुख मितेश वालावलकर यांनी दिली. या दहीहंडी मध्ये ढोल पथक व मोटार सायकल रॅली हे विशेष असणार असल्याची माहिती उपसरपंच स्नेहल सामंत यांनी दिली आहे
या दहीहंडी कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, शिवसेना जि प मा गटनेते नागेंद्र परब,नेरुर जि प शिवसेना विभागप्रमुख शेखर गावडे व इतर पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत तरी या कार्यक्रमाला पंचक्रोशीतल नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवा सेना शाखाप्रमुख संदेश जाधव यांनी केले आहे.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.