आर.ए.यादव हायस्कूल आडवलीमध्ये श्रावण पौर्णिमेनिमित्त(नारळी पौर्णिमा) रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न…!!!

गुरुवार.दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी हायस्कूलच्या भव्य सभागृहात रक्षाबंधन कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन.या सणाचे अनन्यसाधारण असलेले महत्व लक्षात घेऊन राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत वृक्षरक्षाबंधन इको फ़्रेंडली राखी इयत्ता 10 वीतील मुलींच्या शुभहस्ते वृक्षाला बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, तसेच विद्यार्थांकरिता रक्षाबंधन कार्यक्रम सभागृहात संपन्न करण्यात आला.
मा.मुख्याध्यापक यांनी सर्व मुलींना इको फ़्रेंडली राखी घरीच तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यानुसार सर्व विद्यार्थिनींनी इको फ़्रेंडली राखी घरीच बनवून आणलेली होती.मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी घरगुती टाकाऊ वस्तूचा वापर करून सुंदररीत्या तयार करून आणलेल्या राखीचे निरीक्षण करून गुणानुक्रम काढण्यात आले.
प्रथम-कु.संपदा गोपाळ मेस्त्री.
द्वितीय-कु.सीमा आनंद लाड
तृतीय-हर्षदा राजन मालंडकर*
उत्तेजनार्थ-१) कु.जागृती अनिल तांडेल. २) कु.रेवती सुनील लाड.
विद्यार्थी-शिक्षक-मुख्याध्यापक यांना सर्व भावंडाना सर्व लाडक्या बहिणींनी अर्थातचं विद्यार्थिनींनी राखी बांधली तसेच विद्यार्थी-शिक्षक-मुख्याध्यापक यांनी राखी पौर्णिमा सणाचे महत्व अधोरेखित करून आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.