कुडाळात आजपासून कोकण समर फेस्टिवल

‘कोकणची चेडवा’ यांचे आयोजन कलाकार आणि व्यावसायीक यांना मिळणार प्रोत्साहन निलेश जोशी । कुडाळ : छोट्या व्यावसायिकांना आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कोकण समर फेस्टिवल’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 मे 2024 या कालावधीत…

Read Moreकुडाळात आजपासून कोकण समर फेस्टिवल

देवी भगवती माहेरस्वारी सोहळा १० मे रोजी  

मसुरे प्रतिनिधी देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवीचा माहेरस्वारी सोहळा १० मे रोजी होणार आहे. देवी भगवती  मुणगे गावातील कारीवणेवाडी येथे पाडावे कुटुंबीयांच्या घरी दर तीन वर्षांनी माहेरपणासाठी जाते. यानिमित्त कारीवणेवाडी येथे  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

Read Moreदेवी भगवती माहेरस्वारी सोहळा १० मे रोजी  

तारकर्ली रस्त्यावर रस्ता खोदल्यामुळे गाड्यांचे अपघात      मालवण(प्रतिनिधी)मालवण तालुक्यातील पर्यटन गाव जगाच्या नकाशावर असताना सुस्थितीत असलेला तारकर्ली रस्ता दोन्हीं बाजूंनी जल जीवन मिशन खात्याने खोदलेला आहे तो त्वरित जसा होता त्याच स्थितीत येत्या पंधरा दिवसात पूर्ण करावा अशी मागणी तारकर्ली चे…

Read More

*_जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक_*

*मान्सून कालावधीत पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज*

-जिल्हाधिकारी किशोर तावडे

            सिंधुदुर्ग दि ०९ (जिमाका) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज असणे आवश्यक आहे. प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून ठेवावा, गावात कोणतीही आपत्तीजनक घटना घडल्यास त्याची त्वरित माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास (०२३६२)२२८८४७ /१०७७ या क्रमांकावर देण्याच्या सूचना आपल्या प्रत्येक गावातील ग्रामसेवकांना देण्यात याव्यात,तसेच संभाव्य पूरपरिस्थितीत कोणतीही घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून सर्व विभागांनी समन्वयाने परिस्थिती हाताळावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सहायक जिल्हाधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे,  आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी म्हणाले, रस्त्यांवर झाड पडल्यास ते झाड त्वरित बाजूला करण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. तसेच अशा रस्त्यांवरची धोकादायक झाडे/ फांद्या मान्सून कालावधीपूर्वी बाजूला करण्यात याव्यात, मान्सूनपूर्व कालावधीत  महामार्गाच्या दुतर्फा साईड पट्टी ,मातीचा भराव टाकावा, राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक व अपघातप्रवण जागांची निवड व या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, नगरपालिका क्षेत्रातील नाले सफाईची कामे त्वरित हाती घेण्यात यावीत व पावसाळ्यापूर्वी ती पूर्ण करावीत, नगरपालिका अखत्यारीतील रस्त्यांची डागडुजी करून घेण्यात यावी, पावसाळा कालावधीत नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होईल याबाबत दक्षता घेण्यात यावीत, मान्सून कालावधीत नगरपालिका क्षेत्र स्वच्छ राहील याची दक्षता घेण्यात यावी, अस्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरणार  नाहीत याची काळजी घ्यावी, पावसाळा कालावधीतील साथीच्या आजाराचे नियंत्रण करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, पंचायत समिती अंतर्गत विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांची बैठक घेवून आपत्कालीन परिस्थिती तालुक्यास उद्भवल्यास करावयाच्या नियोजनाबाबत विचारविनिमय करावा असेही ते म्हणाले.

          मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देशमुख म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे, पावसाळ्या दरम्यान उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांबाबत जनजागृती करावी, मृत जनावरांची विल्हेवाट लावावी, सूक्ष्म नियोजन करुन परिस्थिती हाताळावी असेही ते म्हणाले.

          बैठकीच्या सुरूवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री सुकटे यांनी सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प माहिती, मान्सून कालावधीतील मुख्य धोके, पूर येण्याची कारणे, दरड कोसळण्याची कारणे, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत शोध व बचाव करिता घेण्यात आलेल्या साहित्याची सद्यस्थिती आदींची माहिती दिली.

००० ०००

Read More*_जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक_*

नेरुर येथे १२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेसह आता अनेक संस्थांचे आयोजन नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग प्रतिनिधी । कुडाळ : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून रविवार १२ मे २०२४ रोजी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग संचलित कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व…

Read Moreनेरुर येथे १२ मे रोजी मोफत आरोग्य शिबीर

हरकूळ खुर्द येथील नृत्यस्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

गावपातळीवर मृण्मयी केरकर विजेती श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत खुली नृत्य स्पर्धा प्रतिनिधी। कुडाळ : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द येथील श्री माता कालिकादेवी उत्सव 2024 अंतर्गत घेण्यात आलेल्या खुल्या जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत पिंगुळीची मृणाल सावंत तर गावपातळीवरील स्पर्धेत…

Read Moreहरकूळ खुर्द येथील नृत्यस्पर्धेत मृणाल सावंत प्रथम

मालवण शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी

आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती प्रतिनिधी । मालवण : मालवण शिवसेना शाखेत आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्री सत्यनारायण…

Read Moreमालवण शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी

को.रे.च्या ‘या’ तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

को.रे.मार्गावर उद्या अडीच तासांचा मेगाब्लॉक निलेश जोशी। सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या निवसर आणि राजापूर रोड या स्थानकांदरम्यान देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या दि. १० मे रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी नऊ वाजून १० मिनिटांपासून ११ वाजून…

Read Moreको.रे.च्या ‘या’ तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

नारायण राणे यांनी वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला

कणकवली : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज मतदान असून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे. मला यश…

Read Moreनारायण राणे यांनी वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला

माजी नगराध्यक्ष यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

कणकवली शहरात भाजपला मताधिक्य मिळवून देणार कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांनी कणकवली भालचंद्र महाराज संस्थांना नजीकाच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला कणकवली शहरात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या असून, मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Read Moreमाजी नगराध्यक्ष यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसमवेत बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण नाईक कुटुंबीय एकाच वेळी मतदानासाठी रांगेत आमदार वैभव नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी आज कणकवलीत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, आई सुषमा नाईक, भाऊ सतीश नाईक, त्यांच्या पत्नी तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत…

Read Moreआमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसमवेत बजावला मतदानाचा हक्क

कणकवली तालुक्यात नाटळ मध्ये एकाला जबर मारहाण

कणकवली पोलिसात मारहाण करणाऱ्या तिघा विरोधात गुन्हा दाखल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनेने तालुक्यात खळबळ लोकसभा निवडणुकीच्या आदल्या रात्री कणकवली तालुक्यातील नाटळ मध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष असलेल्या गणेश सावंत यांना लोखंडी रॉड तसेच बांबू ने मारहाण करत जबर जखमी केल्याची घटना…

Read Moreकणकवली तालुक्यात नाटळ मध्ये एकाला जबर मारहाण
error: Content is protected !!