देवी भगवती माहेरस्वारी सोहळा १० मे रोजी  

मसुरे प्रतिनिधी

देवगड तालुक्यातील मुणगे गावची ग्रामदेवता श्री भगवती देवीचा माहेरस्वारी सोहळा १० मे रोजी होणार आहे. देवी भगवती  मुणगे गावातील कारीवणेवाडी येथे पाडावे कुटुंबीयांच्या घरी दर तीन वर्षांनी माहेरपणासाठी जाते. यानिमित्त कारीवणेवाडी येथे  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.०० वा. वसंतपुष्प शैक्षणिक सामाजिक महिला उत्कर्ष संस्था भांडूप मुंबई तर्फे चित्रकला स्पर्धा, दुपारी ३.३० वा. श्री देवी भगवतीचे माहेर घरी (पाडावे बंधूंच्या घरी) देवालयातुन प्रस्थान, संध्या ५.०० वा. श्री देवी भगवती माहेर घरी आगमन, संध्या ७.०० वा. श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ सावंतवाडी, मुणगे यांचे सुश्राव्य भजन, संध्या ७.३० वा. महाप्रसाद,
रात्रौ ९.३० वा. प्रकाश पा. लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे (डोंबिवली प.) यांचा पौराणिक दशावतारी नाट्य पुष्प “पुण्याई जन्माची”.
११ मे रोजी सकाळी ७.०० वा. श्री देवी भगवतीची ओटी भरणे व दर्शन, दुपारी १२.०० वा. महाप्रसाद, दुपारी ३.०० वा. श्री देवी भगवतीचे मंदिराकडे प्रस्थान होणार आहे.  १३ मे २०२४ सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, संध्या ४.०० ते ६.०० हळदी कुंकू समारंभ, रात्रौ ७.०० वा. आरती व तीर्थ प्रसाद,
रात्रौ ९.३० वा. आमने सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना (२० x २०) डबलबारी भजनाचा जंगी सामना
श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ, आजिवली, सोनारवाडी
बुवा श्री. प्रविण सुतार विरुद्ध श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ओरोस खुर्द बुवा श्री. ज्ञानदेव मेस्त्री यांच्यात होणार आहे. उपस्थितीचे आवाहन  पाडावे बंधु मुणगे, कारिवणेवाडी यांनी केले आहे.

🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.
error: Content is protected !!