संजय गांधी निराधार योजना समितीच्या पहिल्याच बैठकीत तब्बल 51 प्रकरणांना मंजुरी

अध्यक्षपदी शरद कर्ले यांची निवड झाल्याबद्दल तहसीलदारांनी केले अभिनंदन उत्पन्नाची मर्यादा 21 हजारा पेक्षा वाढवण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करणार कणकवली तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी शरद कर्ले यांची निवड झाली आहे. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी या निवडीबद्दल श्री.कर्ले यांचे…

कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी तात्पुरते केंद्र उभारणार

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती त्या कर्मचाऱ्यांना 11 हजार रुपये मानधन सुरू कणकवली शहरातील प्रलंबित विकास कामांबाबत ठेकेदारांना तातडीने सूचना कणकवली शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी केली जाणार आहे. त्‍याअनुषंगाने लवकरच एका एजन्सीची…

राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयावर जप्तीची कारवाई

दरखास्तदारांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद सन २००३ मध्ये एसटी व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातप्रकरणी मृताच्या नातेवाईकांना भरपाईचे आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिले होते. सदरच्या आदेशाविरूद्ध रा.प. महामंडळाने उच्च न्यायालयात केलेले अपिल काढून टाकल्याने जिल्हा न्यायालयात १ कोटी २ लाख…

कणकवली शहरात काही भागांमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद

मुख्य जलवाहिनी लिकेज असल्याने होणार दुरुस्ती कणकवली शहरामध्ये बांदकरवाडी टाकीवरून होणारा पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी लिकेज असल्याने काही ठिकाणी बंद राहणार आहे. यामध्ये 3 जानेवारी रोजी कणकवली शहरातील निम्मेवाडी,भालचंद्रनगर, मधलीवाडी ,कांबळे गल्ली, सुतारवाडी, टेंबवाडी, फौजदार वाडी, डेगवेकर पोहे मिल, शाळा नं.…

भाजपा कणकवली तालुका ग्रामीण मंडळ उपाध्यक्षपदी अनुप वारंग

मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी केली निवड जाहीर माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र कणकवली तालुका भाजपा ग्रामीण मंडळ उपाध्यक्षपदी अनुप वारंग यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी ही निवड जाहीर केली.…

पत्रकार स्वप्निल वरवडेकर यांना पितृशोक

तुकाराम वरवडेकर यांचे निधन मूळ वरवडे – बौद्धवाडी व सध्या कलमठ – गावडेवाडी (ओमगणेश कॉलनी) येथे स्थायिक असलेले तुकाराम शिवा वरवडेकर (वय ८३) यांचे गुरुवारी रात्री ११.४५ वाजता वृद्धापकाळाने व‌ अल्पशा आजाराने कणकवलीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,…

प्रत्येक कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित करा, जनतेच्या कामात बेदबाबदारपणा दिसता नये!

कणकवली नगरपंचायत चा कारभार गतिमान होण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागा नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना मंत्रालय पातळीवरील प्रस्ताव पाठपुरावा करून तातडीने मार्गी लावणार कणकवली नगरपंचायतीचा कारभार गतिमान व्हायला हवा. सांडपाणी निचरा व्यवस्था केल्याशिवाय कुठल्‍याही संकुलांना पूर्णत्‍वाचा दाखला देऊ नका.…

साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम यांच्या अपात्रतेचा आदेश रद्द, सदस्यत्व अबाधित

मुख्य निवडणूक आयुक्त यांचा आदेश अर्जदार वर्दम यांच्यावतीने ॲड. उमेश सावंत व ॲड. रघुवीर देसाई यांचा युक्तिवाद साकेडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रज्वल वर्दम यांनी ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुकीतील निवडणूक खर्च विहित कालावधीमध्ये सादर न केल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अपात्र ठरविल्याचा…

कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड

9 नगरसेवकांच्या गट नोंदणीची प्रक्रिया आज पूर्ण कणकवली नगरपंचायत च्या भाजपाच्या 9 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी देखील आजच जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. भाजपाच्या कणकवली नगरपंचायत च्या गटाच्या गटनेतेपदी सुप्रिया समीर नलावडे यांची निवड करण्यात आली असून, आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत गट नोंदणीची…

तळेरे येथील विवाहीतेची आत्महत्या

तळेरे – दत्तनगर येथील सौ. दुर्गा देवेंद्र खटावकर (29) हिने गुरूवारी सकाळी 9.23 वा. च्या पूर्वी घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गळफास लावून आत्महत्या केली. मात्र तिचे आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.याबाबतची खबर तिचे सासरे रंजन खटावकर यांनी पोलिसांना दिली.गुरूवारी…

error: Content is protected !!