विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे राबविण्यात आला पर्यावरण पूरक राखी तयार करणे हा उपक्रम.

कणकवली/मयुर ठाकूर.

विद्यामंदिर कणकवली येथे हा रक्षाबंधनाचे औचित्य साधून उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यानी अतिशय सुंदर अशा लोकर पासून, कागदापासून, वेगवेगळ्या झाडांच्या बियांचा उपयोग करून राख्या तयार केल्या त्याचबरोबर ह्या उपक्रमामध्ये वैशिष्ट्य म्हणजे वेगळेपणा म्हणजे माती पासून राख्या तयार करून त्या मातीच्या राखी मध्ये वेगवेगळ्या फळझाडांच्या, पालेभाज्यांच्या बिया टाकून अशाही राख्या बनवण्यात आल्या ह्यांनाही पालकांचा, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि सगळ्यात शेवटी ह्या राख्या तयार करून प्रशालेमध्ये त्याचं प्रदर्शन व विक्री स्टॉल लावण्यात आले त्याची विक्री करण्यात आली पालकांनी राख्या खरेदी करून खूप चांगल्या पद्धतीने त्यालाही प्रतिसाद दिला तसेच झाडाला राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन हाही कार्यक्रम घेण्यात आला या उपक्रमामध्ये पर्यावरण सेवा योजनेचे प्रमुख प्रसाद राणे सर हरित सेना विभाग प्रमुख सौ शिरसाट मॅडम त्याचबरोबर नागभीडकर सर कार्यानुभव चे शिक्षक हे सहभागी होते आणि ह्या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे आणि पर्यवेक्षिका श्री व्ही बी जाधव मॅडम यांचे खूप चांगल्या पद्धतीने मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य लाभलं त्यामुळे हा उपक्रम यशस्वी होऊ शकला

error: Content is protected !!