आंब्रड दशक्रोशीसाठी स्वतंत्र सबस्टेशनची मागणी

दशक्रोशीतल्या वीज समस्यांबाबत वीज ग्राहक संघटनेचा पुढाकार

सणासुदीच्या काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे महावितरणचे आश्वासन

प्रतिनिधी । कुडाळ : आंब्रड आणि दशक्रोशीत सणासुदीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहील असे आश्वासन महावितरण कंपनीकडून देण्यात आले आहे. वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग आणि आंब्रड ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आंब्रड येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. आंब्रड गाव व दशक्रोशी मोठी असल्याने सबस्टेशनाची मागणी दशक्रोशितील सर्व गावंच्या वतीने यावेळी करण्यात आली.
विज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग आणि ग्रामपंचायत आंब्रड यांच्या संयुक्त विद्यमाने आंब्रड येथे वीजग्राहकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध वीज समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महत्वाच्या समस्येवर चतुर्थीपुर्वी मार्ग काडुन विज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचे आश्वासन महावितरण कडून देण्यात आले. तसेच आंब्रड गाव व दशक्रोशी मोठी असल्याने सबस्टेशनाची मागणी दशक्रोशितील सर्व गावंच्या वतीने यावेळी करण्यात आली.
यावेळी महावितरणचे कुडाळ विभागाचे कार्यकारी अभियंता अजितपाल सिंग दिनोरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर श्री.मिसाळ ,काडावलचे उप अभियंता श्री.भोये तसेच तर वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट, वीजग्राहक संघटना समन्वयक .नंदन वेंगुर्लेकर कुडाळ तालुका सदस्य साईनाथ आंबेरकर, जि प सदस्य लौरेन्स मान्येकर, सरपंच सौ मानसी कदम, पोखरण सरपंच सौ. जाधव, कुंदे सरपंच सचिन तायशेट्ये, उपसरपंच विठ्ठल तेली, माजी सरपंच संदीप परब, आबा मुंज, स्वप्निल मुंज, पांडुरंग दळवी, पोलीस पाटील देवेंद्र दळवी, तात्या आंगणे व ग्रामस्थ मोठ्यात संख्येने उपस्थित होते.

प्रातिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!