४४ वर्षें जनसेवा… पोस्टमन गजाभाऊचा हृद्य सत्कार

तब्बल ४४ वर्षें दिवसाला सरासरी १५ कि. मी. पायी चालत गावकर्यांच्या सुख – दु:खात सहभागी होऊन पोस्टमन म्हणून काम करणारे नांदरुख गावचे गावकरी गजानन विश्वनाथ चव्हाण तथा गजाभाऊ यांचा सत्कार गावकऱ्यांनी केला.
ग्राम सेवा संघ, नांदरुखचे अध्यक्ष, माजी सरपंच दिनेश गजानन चव्हाण, सचिव समीर शशिकांत पाटकर आणि सहकार्यांनी मिळून गजानन विश्वनाथ चव्हाण यांच्या ४४ वर्षांच्या पोस्टमन पदाच्या निवृती आणि ६५ व्या वाढदिवसाच्या सत्काराच्या निमित्ताने दुग्धशर्करा योग घडवून आणला. नांदरुख गावातील पुर्ण प्राथमिक शाळा, नांदरुख-आंबडोसच्या सभागृहात हा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी आंबडोस गावचे माजी सरपंच, प्रमुख मानकरी दिलीप परब होते. व्यासपीठावर गजानन चव्हाण, पत्नी सौ. गजश्री चव्हाण, नांदरुख, चौके गावांचे सरपंच रामचंद्र चव्हाण, गोपाळ चौकेकर,नांदरुखच्या माजी सरपंच समृद्धी चव्हाण, स्मिता पाटकर, आंबडोसच्या माजी सरपंच राधा वरवडेकर, तसेच रमेश चव्हाण, विलास चव्हाण, सुनील चव्हाण, नांदरुखचे सुपूत्र , ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण होते.
अध्यक्षपदावरून बोलताना दिलीप परब यांनी गजाभाऊ हे गेली तब्बल ४४ वर्षें उन पावसाची तमा न बाळगता पायीवारी करत दिवसाला दोन्ही गावांत सरासरी १५ कि. मी. चे अंतर तुडवत होते. त्यांनी गाववाल्यांशी जवळकीचे भावनिक नाते जोडले याचा आवर्जून उल्लेख केला
दिनेश चव्हाण यांनीमनीऑर्डर संस्कृतीत गणेशोत्सव काळात कोणा भगिंनींची मनीऑर्डर पोचायला उशीर झाला तर त्यांनी पदरचे पैसे देऊन गजानन हे नाव सार्थ केले आहे. त्यामुळे गजाभाऊ हे आमच्या गावचे खर्या अर्थाने भूषण आहेत. असे सांगितले
शाळकरी सोबती भाई चव्हाण यांनी आपल्या भाषणात मुक्तकंठाने गजाभाऊंची प्रशंसा केली
यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांसह चौके डाक कार्यालयाच्या प्रमुख सौ. चिपकर, सहकारी भुषना तावडे, नांदरुख, आंबडोस, रेवंडी, वायरी, साळेल, माळगाव, काळसे, बांदिवडे, कुंभारमाठ, वायरी , आंबेरी, धामापूर आदी गावांतील पोस्टमन, चौके व्यापारी संघाचे अध्यक्ष रघुनंदन राणे आदींनी सत्कारमुर्तीला आपल्या भाषणांतून शुभेच्छा दिल्यात. सूत्रसंचालन ग्रा. पं. सदस्य संगम चव्हाण यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री प्रशांत नाईक, विशाल धुरी, सुरेश राणे, सुहास राणे, अभय परब, भरत तोंडवळकर, विकास चव्हाण, नितिन चव्हाण, घनश्याम परब, प्रसाद लाड, समीर लाड, सतीश कांबळी, संदीप कांबळी, दिपेश नामनाईक आदींनी परिश्रम घेतले.
मालवण ( प्रतिनिधी)