तरंदळे – देऊळवाडी शाळेमध्ये राख्या बनविण्याची कार्यशाळा

उपक्रमशील शिक्षिका मीना बुचडे, अक्षया लोकरे यांचा स्तुत्य उपक्रम
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंदळे देऊळवाडी येथील उपक्रमशील शिक्षिका सौ मीना बुचडे व सौ अक्षया लोकरे यांनी आपल्या शाळे मध्ये नुकतीच राखी बनवणे कार्यशाळा घेत एक वेगळा उपक्रम राबवला. पालक व विद्यार्थी यांच्यासाठी राख्या बनविण्याची कार्यशाळा घेतली. यावेळी सदर कार्यशाळेत सहभागी पालक वर्ग व विद्यार्थी यांनी बाजारातील राख्यांप्रमाणेच राखी बनविल्या आहेत. पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमधून मुलांमधील कलागुणांना वाव मिळत असून मुलांनी देखील हिरीरीने या उपक्रमात सहभाग घेतला.
कणकवली प्रतिनिधी