कोकण किनारपट्टी वरील मच्छीमारांवर प्रत्येक शासनाचे दुर्लक्ष छोटे मच्छीमार आणि रापण संघातील सभासद यांना ७५००० हजाराची पॅकेज जाहीर करा – सुरेश बापर्डेकर

देवबाग (मालवण)
समुद्राच्या किनारपट्टीवरील कोकण किनाऱ्यावरील छोटे मच्छीमार आणि रापणकर यांचा समुद्रातील मच्छिचार व्यवसाय म्हणजे उपासमार असतो . त्यांना एक तर मासे मिळत नाही.मिळाले तर चार दिवस मिळाले की दोन महिने काहीही मिळत नाही.पूर्वीची म्हण आहे फावला तर फावला भिंतिवर नाव रवला तस गावला तर गावला नायतर कुटुंबासह उपास करा अगर कर्ज बाजारी व्हा ही कोकणातील मच्छिमारांची व्यथा आहे ते बोंब मारत नाही की आत्महत्या करत नाही . याच करिता दुष्काळ जाहीर करावा आणि छोट्या मच्छीमार सह रापण संघातील प्रत्येक सभासदांना ७५००० हजार रुपये प्रतिवर्षी द्यावेत अशी मागणी अखिल भारतीय मच्छीमार गाबित समाज महासंघ चे सरचिटणीस सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,काही वेळा एखाद्या रापण कंपनी ला केव्हातरी बंपर मासळी मिळाली याचा अर्थ तो संघ श्रीमंत झाला अस नाही त्याला भाव (दर )मिळत नाही त्याला कित्येक वेळा चुर्मुल्याच्या भावाने व्यापाऱ्याला द्यावे लागतात तर पुढे महिना दोन महिना ताटकळत राहावे लागते .यामुळे माध्यमांना पुरेशी माहिती मिळत नसल्याने त्यात्या विभागाचे लोकप्रतिनिधी मच्छिमारांची व्यथा समस्या शासनापर्यंत मांडली जात नाही .राजकीय सर्व पक्ष किनारपट्टीवरील सर्व मच्छीमारांचा निवडणुकीला वापर करून घेतात नंतर फेकून देतात.माछीमाराची व्यथा आणि समस्या त्यांची होणारी गैरसोय आणि त्या त्या मच्छीमारांचे होणारे नुकसान हे स्वतःचा त्या समाजाचा लोकप्रतीनीधीं नसल्याने मच्छीमारांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधी नाही.
याकरिता सरकारचे ज्या प्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करून प्रतिवर्षी ठराविक रक्कम दिली जाते तशी कीनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारण रापण संघ १०५ असून त्यावर ४४०५ सभासद अवलंबून आहेत .तरी प्रत्येक छोटे मच्छीमार आणि रापण संघातील प्रत्येक सभासदांना आणि छोटे एक सिलिंडर,दोन सिलिंडर,चार सिलिंडर हे वेगळेच आहेत तरी यांना वार्षिक ७५,००० हजार रुपये देण्यात यावे .हे प्रती वर्षी देण्याचा कायमस्वरूपी जीआर काढावा.आणि नियोजनही करून ठेवावे कडून केली जात आहे.
अशी मागणी अखिल भारतीय मच्छीमार गाबित समाजाच्या वतीने सरचिटणीस सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!