कणकवलीतून फ्लाय ओव्हर ब्रिज खाली पार्किंग केलेला डंपर चोरीला

सदर वर्णनाचा डंपर आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधा

कणकवली उबाळे मेडिकल समोरील उड्डाण पुलाखाली लावलेला गंधार सदानंद बाणे यांच्या मालकीचा डंपर (क्र – एम.एच -०७ सी-६३०८) असून रात्री चोरीस गेला आहे. भर कणकवली शहरातून हा डंपर चोरी करत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.
सदर डंपरच्या समोरील बाजूस सफेद कलर असून मागील हौदा भगव्या कलर असलेला आहे. त्या डंपरच्या काचेवर श्री. गांगोभैरी, ब्राह्मणदेव प्रसन्न, नमो भालचंद्राय,दत्तकृपा असे रेडियमने लिहिलेले आहे. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.जर हा डंपर कोणाला दिसला असेल तर त्यांनी मालक श्री. बाणे मो.९४२३३००४९६ किंवा कणकवली पोलीस ठाण्यात यांना तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!