राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घेतली भेट

सदिच्छा भेट घेतल्याची आमदार नाईक यांची माहिती

          राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार  हे कोल्हापूर येथील पक्षाच्या सभेसाठी आले असता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी  कोल्हापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत  शरद पवार यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले. यावेळी शरद पवार यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा करत त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले.
    यावेळी माजी मंत्री बंटी पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,श्रीनिवास पाटील, कोल्हापूर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख  विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, रविकिरण इंगवले आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर सिंधुदुर्ग

error: Content is protected !!