पत्रास कारण असे कि…..

मनसेच्या कुणाल किनळेकर यांचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र
विकासात्मक कामांसाठी मनसेची आता पत्र पॉलिसी
प्रतिनिधी । कुडाळ : मनसेचे माजी युवा जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवले आहे. विकासात्मक तसेच रोजगार विषयक कामांसाठी यापुढेही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच यापुढे देखील मंत्री महोदयांशी अशाचप्रकारे पत्रव्यवहार करणारं असल्याचं किनळेकर यांनी म्हटले आहे. कुणाल किनळेकर यांनी मंत्री रवींद्र चव्हाण याना पाठविलेले पत्र खाली देत आहोत.
प्रति,
ना. रविंद्र चव्हाण साहेब,
सार्वजनिक बांधकाम तथा
पालकमंत्री सिंधुदुर्ग.
सस्नेह जय महाराष्ट्र!
पत्रास कारण की आपले दिनांक२१/०८/२३ चे पत्र, माननीय मंत्री महोदय आपण आपल्या विभागाचे काम करत असताना आपल्यालाही अनुभव असेलच या मुजोर सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा आणि अशावेळी आपण बंद दाराआड त्या अधिकाऱ्यांना कोणत्या भाषेत काय समजवलत याचा. माननीय मंत्री महोदय कदाचित आपण आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर घेतलेली स्वाभिमानी प्रतिज्ञा अवलंबण्यास थोडासा विलंब झाला. साहेब आपण म्हणता त्याप्रमाणे महात्मा गांधी यांच्या सांगितलेल्या मार्गाने चालताना आपल्या सामान्य जनतेचा आवाज राज्यकर्त्ये तसेच प्रशासन पर्यंत पोहोचत नसेल तर महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक वि.दा सावरकर यांचा मार्ग सुद्धा कधी तरी अवलंबावा लागतो. म्हणूनच या मार्गाचा आवाज आपल्या अपेक्षित जागी लवकर पोहोचतो. याचे उदाहरण म्हणजे गेल्या पाच आणि मधली अडीज वर्षे सोडली तर त्यानंतर आताचे एक दीड वर्ष यानंतरचे आपले राज साहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांसाठीचे पत्र.
कोकणचा सुपुत्र राज्याच्या महत्त्वाच्या खात्याचा मंत्री म्हणून कोकणवासीयांच्या मोठ्या अपेक्षा आपल्या कडून आहे. त पण मधली अडीच वर्षे सोडली तर गेली पाच वर्षे व आत्ताची एक दीड वर्षे आपण अनेकदा गेली सतरा वर्षे जवळपास पंधरा हजार कोटी पेक्षाही जास्त खर्चून रखडलेला मुंबई गोवा महामार्गाची आपण अनेकदा धावती पाहणी केली तरीही परिस्थिती जैसे थेच. म्हणून शेवटी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी यावर लक्ष देताच महाराष्ट्र सैनिकांनी कोकणी जनतेचा आवाज हातात दगड घेऊन काढल्यावरच तुम्हाला ऊन, पाऊस वारा याची तमा न बाळगता स्वतःच्या मातीसाठी काहीतरी करण्याची भावना जागी झाली.
असो तूर्तास इथेच थांबतो भविष्यात वेळोवेळी आपण सुरू केलेल्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून कोकणी जनतेचा आवाज आपल्यापर्यंत पत्राच्या माध्यमातून पोहोचवत राहू.
आपला विश्वासू
सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र सैनिक.
अशा शब्दात कुणाल किनळेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपर्यंत आपल्या भावना पोहोचवल्या आहेत.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.