सांगवे आंबेडकरनगर समाज मंदिराच्या अपूर्ण कामाविरोधात उपोषण

जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत दिला पाठिंबा
सांगवे आंबेडकर नगर येथील समाज मंदिराच्या अपूर्ण कामाला जबाबदार कोण? ठेकेदाराच्या देयकाची 70 टक्के रक्कम देऊनही अद्याप समाज मंदिराचे काम पूर्णच आहे. त्यामुळे या संदर्भातील जबाबदार ठेकेदार व अभियंता या दोघांवरही कारवाई केव्हा होणार? या मागणी करिता आज कनेडी मध्ये सांगवे ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण छेडण्यात आले. जोपर्यंत गटविकास अधिकारी जागेवर येत नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. तर या उपोषणाला शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील भेट देत पाठिंबा दिला. यावेळी ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा आक्रमक भूमिका घेण्याचा देखील इशारा दिला. या उपोषणा वेळी अर्जुन कांबळे, सुनील कांबळे, प्रदीप कदम, विश्वनाथ कांबळे, संतोष चव्हाण, भाग्योदय कांबळे, सागर चव्हाण, संदीप तांबे, तुषार गावकर, कुणाल सावंत, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, माजी प स सदस्य मंगेश सावंत आदी सहभागी झाले होते.
कणकवली प्रतिनिधी