तुतारी एक्सप्रेस चे नांदगाव रेल्वे स्टेशन मध्ये भाजपा कडून स्वागत
केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी ग्रामस्थांच्या मागणीला दिला न्याय
नांदगाव रेल्वे स्टेशन मध्ये भाजपाकडून जल्लोष
तुतारी एक्सप्रेस चे आज शुक्रवारी कणकवली तालुक्यातील नांदगाव रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या जवळ तुतारी एक्सप्रेस नांदगाव रेल्वे स्टेशन मध्ये थांबवण्याबाबत नागरिकांकडून मागणी करण्यात आली होती. माजी सरपंच संतोष राणे यांच्यासह नांदगाव दशक्रोशीतील लोकांनी मागणी केल्यानंतर नुकतीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले होते. व त्यानंतर तात्काळ याबाबतचे आदेश देण्यात आले. आज नांदगाव रेल्वे स्टेशन मध्ये भाजपाच्या वतीने तुतारी एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा विधानसभा प्रमुख संतोष कानडे, सरपंच अजय रावराणे, माजी सरपंच संतोष राणे, नांदगाव सरपंच रविराज मोरोजकर, सुनील लाड आदी उपस्थित होते. यावेळी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
दिगंबर वालावलकर /कणकवली