देवगड म्हाळुंगे येथे भाजपाच्या वतीने वह्या वाटप
देवगड/मयुर ठाकूर.
देवगड म्हाळुंगे येथील शाळा क्रमांक १ व राणेवाडी शाळा येथील विद्यार्थ्यांना आज पालक मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने दिलेल्या वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते के.बाळकृष्ण सखाराम राणे यांच्या जन्मशाब्दीनिमित्त वर्षानिमित्त मुलांसाठी प्रश्नमंजुषा हा कार्यक्रम घेण्यात आला बरोबर उतर देणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य बक्षीस स्वरूपात देण्यात आले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रामकृष्ण राणे यांनी केले
कार्यक्रमाला विस्तार अधिकारी दहिफळे सर,सरपंच संदीप देवळेकर,मुख्याध्यापक सुनील मांजरेकर,कुंडलिक माने,शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप राणे,कृष्णा नवले,विजयदुर्ग पो.उपनिरीक्षक दशरथ चव्हाण,संजय तावडे व राणे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.