पूरस्थितीत नागरिकांना त्रास होत नये याची दक्षता घ्या!
आमदार नितेश राणेंनी आचरा मार्गावर पाणी भरलेल्या भागाची केली पाहणी
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज कणकवली दाखल झालेल्या आमदार नितेश राणे यांनी कणकवली आचरा रस्त्यावरील फणसवाडी येथील पुरस्थितीची पाहणी केली. सातत्याच्या पावसामुळे आचरा मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने येथे भेट देत श्री. राणे यांनी पाहणी करून स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आमदार नितेश राणे यांनी प्रशासनाला दक्षतेबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. नागरिकांना पूरस्थितीत कोणतीही हानी पोचू नये यासाठी सतर्क राहावे काळजी घ्यावी असे सांगितले. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार रमेश पवार, कणकवली शेतकरी ख वि संघाचे अध्यक्ष प्रकाश सावंत, वरवडे सरपंच करुणा घाडीगांवकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी सरपंच इब्राहिम शेख, सिरील फर्नांडिस, सुभाष मालंडकर, दिगंबर उर्फ आप्पा सावंत आदी उपस्थित होते.