शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी हरेश पाटील

कणकवली तालुका सचिव पदी रवींद्र नवाळे
जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी जाहीर केली नियुक्ती
सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी हरेश पाटील यांची तर कणकवली तालुका सचिवपदी रवींद्र नवाळे यांची तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी आज कणकवली येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालयात निवड जाहीर केली. यावेळी विधानसभा प्रमुख संदेश पटेल, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, समन्वयक सुनील पारकर, राजेंद्र तेली, भगवान तेली, दिलीप वैरागअरुण दळवी, सुनील गोसावी, जनार्दन पवार, एकनाथ चव्हाण, शांताराम राणे, शांताराम पार्टे, सुभाष परब, शशिकांत परब विजय परब, दीपक चव्हाण, पांडुरंग चव्हाण, प्रमोद पवार, अरविंद सावंत, अनंत सावंत, प्रदीप कामतेकर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असणारे पक्ष संघटनेचे काम करून लोकहिताच्या कामांना प्राधान्य देणार आहे.गावोगावी जाऊन शिवसेना शाखा उघडून पक्षसंघटन मजबूत करणार असल्याचे हरेश पटेल यांनी सांगितले.
कणकवली प्रतिनिधी