आंबोली वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात तसेच वनहद्दीत कचरा टाकता येणारं नाही कडक होणारं कारवाई

उप वनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी यांचा इशारा

सावंतवाडी

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना आवाहन करण्यात येते की, धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात तसेच वनहद्दीत कचरा करु नये. वनास व पर्यावरणास बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य करु नये. भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव अधिनियम 1972 या कायद्यांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विशेषतः भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) ड प्रमाणे शासकीय जंगलात अपप्रवेश केल्यास कायदेशिर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा सावंतवाडी वन विभागाचे उप वनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी दिला आहे.

आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून सावंतवाडी तालुक्यातील मौजे पारपोली वनक्षेत्रात आंबोली धबधबा येतो. या धबधब्याचा निसर्गसौदर्याचा आस्वाद घेण्यासाठी व वर्षा पर्यटनासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक आंबोली धबधब्यास भेट देत असतात. सदर धबधबा हा आंबोली घाटातील राज्य महामार्गावर स्थित असून, याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पर्यटकांच्याकडून धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात प्लास्टीक कचरा, बॉटल, खाद्यपदार्थाचे रॅपर तसेच इतर घनकचरा केला जातो. त्यामुळे पर्यावरणास बाधा निर्माण होवून वनातील जैवसाखळीवर त्याचा दुष्परिणाम होतो. तसेच पर्यटकाकडून होणाऱ्या ध्वनी प्रदुषणामुळे वन्य जीवांच्या अधिवासास बाधा निर्माण होते. त्यामुळें पर्यटक यांनी नियामाचे आता पालन करावे लागणार आहे.

error: Content is protected !!