बोडदेत सार्वजनिक विहीर जमिनीत गडप

दुर्घटना टळली;विहिरीवर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांचे पाण्याविना हाल

प्रतिनिधी l दोडामार्ग
बोडदे आंबेडकरनगर येथील सार्वजनिक विहीर पहिल्याच पावसात कोसळली आणि जमिनीत गडप झाली.विहीर गायब झाल्याने मोठा गोलाकार खड्डा पडला आहे. तत्पूर्वी विहिरीच्या आजूबाजूला तडे गेले असल्याने पाणी भरण्यासाठी महिला घाबरून जात नव्हत्या.त्यामुळे दुर्घटना टळली. विहीर कोसळल्याने तेथील ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होणार आहेत.
ग्रामपंचायतीने वेळेत विहीर दुरूस्ती केली असती तर विहीर कोसळली नसती. आमच्यावर सतत अन्याय केला जात आहे. त्यामुळे आम्हाला पिण्याचे पाणी आणि न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाहीत असा इशाराही आंबेडकर नगर मधील रहिवाशांनी दिला आहे.

…तर २० जुलैला आत्मदहन

            जवळपास तीस वर्षांपासून ती विहीर दुरुस्ती करावी, आपण त्यासाठी दोन गुंठे जमीन देण्यास तयार आहे असे सांगून देखील ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले. तो वाडीवरील लोकांवर अन्याय असल्याचा आरोप चंद्रकांत जाधव यांनी केला आहे .विहीर सोमवारी (ता.२६) कोसळली.त्याची कल्पना देवूनही विहिरीच्या सभोवती सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे श्री .जाधव यांनी म्हटले आहे.वाडीतील ग्रामस्थांना न्याय आणि  पर्यायी पाणी  न मिळाल्यास  २० जुलैला आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
error: Content is protected !!