दोडामार्ग बसस्थानकाच्या आवारातील वटवृक्षाची फांदी कोसळली

दोडामार्ग l प्रतिनिधी
येथील बस स्थानकाच्या आवारात असलेल्या जुनाट वटवृक्षाची मोठी फांदी सोमवारी सायंकाळी कोसळली. सुदैवाने बस स्थानकात एसटी बस अथवा कुठलीही खासगी गाडी नसल्याने अनर्थ टळला. तथापि, दुसरी फांदीही जीर्ण झाली आहे आणि केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. नुकताच वटपौर्णिमा सण साजरा झाला. त्यावेळी अनेक महिलांनी वडाकडे गर्दी केली होती.त्यावेळीं फांदी कोसळती तर अनर्थ घडला असता.
कसई दोडामार्ग नगरपंचायतीने आवारातील फांदी हटवावी आणि दुसरी धोकादायक फांदी तोडून प्रवाशांच्या जीवावरचा धोका टाळावा अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!