उसप मधील दिव्यता मोरजकर व रंजना नाईक यांना पुरस्कार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित
उसप मधील अंगणवाडी शिक्षिका दिव्यता दशरथ मोरजकर आणि रंजना नाईक यांचा आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे अशा प्रत्येक ग्रामपंचायतमधील दोन महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दिला जात आहे. त्यांची निवड ग्रामपंचायतीने करावयाची आहे.
उसप गावातील अंगणवाडी शिक्षिका दिव्यता दशरथ मोरजकर व रंजना नाईक यांना त्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उसप गावच्या सरपंच रुचिता प्रवीण गवस व उपसरपंच ॲड.दाजी नाईक यांच्या हस्ते
शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनिता मोरजकर, सामाजिक कार्यकर्ते दशरथ मोरजकर, प्रवीण गवस, संतोष जाधव आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी l दोडामार्ग