विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . भारत सरवदे सर नियत वयोमानानुसार निवृत्त.

कणकवली/मयुर ठाकूर

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . भारत सरवदे सर नियत वयोमानानुसार आज ३१ मे २०२३ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत . श्री भारत सरवदे सर हे मूळचे सांगली जिल्हातील गवाण या गावचे तासगाव तालुक्यातील एक छोटेसे खेडेगाव सतत अवर्षण आणि दुष्काळी भाग म्हणून अति दुर्गम असलेला प्रदेश सर्वत्र खडकाळ जमिन आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य अशा भागात राहून घरची परिस्थिती बेताची असून सुद्धा काबाड कष्ट करणाऱ्या सरांच्या आई वडिलांनी श्री भारत सरवदे सरांना गणित या विषयात उच्च शिक्षण दिले . अनेक हाल उपेक्षा सोसत सोसत भारत सरवदे सर नोकरीच्या शोधात असतांना काही काळ बी.एससी बीएड असूनही परिस्थितीवर आणि घरच्या गरीबीवर मात करण्यासाठी पोलीस सेवेत भरती झाले काही काळ तेथे राहून त्यांचे मन शिक्षकी पेशाकडे ओढ घेत होते आणि त्याच दरम्यान कणकवली विद्यामंदिर मध्ये गणित विषयाची जाहिरात आली सरांनी खूप परित्रातून शिक्षकी पेशात प्रवेश केला . विद्यामंदिर प्रशाला लौकीक प्राप्त झालेली जिल्ह्यातील अग्रगण्य शाळा या शाळेत सरांनी गणित विषयाचे ३१ वर्षे अध्यापन केले गणिताचा मूलभूत पाया सुधारण्यासाठी सरवदे सरांनी सुरुवातीच्या कालखंडात एकही सुट्टी घेतली नाही कोणताही रविवार व सणासुदीला सुट्टी घेतली नाही सतत जादा तास घेऊन विद्या मंदिर प्रशालेचा गणित विषयाचा पाया भक्कम केला सर सकाळी ९ वाजता वर्गात अध्यापनासाठी ऊभे राहिले की संध्याकाळी ६ वाजता अध्यापन बंद करायचे स्वतः जेवण करून खायचे सतत गणिताचा ध्यास घेतलेले अपार कष्ट घेऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी उंचावत ठेवणारे प्रज्ञावंत अध्यापक म्हणून विद्यार्थी प्रिय आणि शिस्तबद्ध शिक्षक म्हणून कणकवली शहरात व परिसरात भारत सरवदे सरांनी लौकीक मिळविला . शिक्षक ‘ पर्यवेक्षक ‘ आणि मुख्याध्यापक ही तिन्हीही पदे श्री सरवदे सरांनी उत्तम रितीने सांभाळली . पालक ‘ विद्यार्थी , शिक्षक ‘ संस्था चालक यांच्यात समन्वय साधून विद्यामंदिर प्रशालेच्या उत्कर्षात सरांनी भर घातली इयत्ता दहावीचा निकाल सरांच्या काळात उंचावत गेला . अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन जीवनात स्थिर झाले . शांत ‘निगर्वी ‘ संयमी ‘ स्वभाव गुणामुळे सरांनी आपली कारकीर्द यशस्वी करून दाखविली . सर्व संकटावर मात करून येईल परिस्थितीला सामोरे जाण्याची जिद्द त्यांच्या जवळ असल्याने अनेक समाज उपयोगी कामे सहजरित्या पार पडली . श्री सरवदे सर कुटुंबवत्सल आहेत सरांची तिनही मुले उच्च शिक्षण घेत आहेत. सरांची सौभाग्यवतीही उच्च शिक्षित आहे. सर्वांच्या सहकार्याने भारत सरवदे सरानी विद्या मंदिर प्रशालेची भरभराट केली गणित विषयाचे अवघडपण सहज सोपे केले . ३१ वर्ष सेवा प्रामाणिकपणे पार पाडून आज नियत वयोमानुसार निवृत्त होत आहेत . श्री भारत सरवदे सरांना उदंड आयुष्य लाभो सुख समुद्धी मिळो यासाठी विद्यामदिर प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संस्था पदाधिकारी यांच्या मार्फत सरांना सेवा निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा .

श्री पी.जे कांबळे
विद्यामंदिर कणकवली .

error: Content is protected !!