अहिल्यादेवी होळकर पुरस्कार साकेडी माजी सरपंच रीना राणे, आशा सेविका वैशाली गुरव यांना प्रदान

सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
पुरस्काराच्या निवडी बद्दल सर्व स्तरातुन होतेय कौतुक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने शासनातर्फे जाहीर करण्यात आलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार साकेडी ग्रामपंचायत साकेडी माजी सरपंच रीना राणे व आशा सेविका वैशाली गुरव यांना आज सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते वितरण करण्यात आला. गेल्या तीन वर्षात या पुरस्कार विजेत्यानी केलेल्या कामाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार निवड समितीने ही दोन नावे निश्चित करत त्यांना पुरस्कार जाहीर केला व त्याचे वितरण आज करण्यात आले. यावेळी साकेडी सरपंच सुरेश साटम, उपसरपंच प्रज्वल वर्दम, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, सुविधा गुरव, प्रतिक्षा जाधव, ग्रामसेवक संजय तांबे, आरोग्य सेविका सौ मेस्त्री, डॉ. दीक्षा वाघमारे, सिद्धार्थ नारिंगरेकर, काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष आयेशा सय्यद, अंगणवाडी सेविका स्नेहा गोगटे, उषा लाड, सौ ढवण, ग्रामपंचायत कर्मचारी रोहित राणे, चंद्रकांत ढवण आदी उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी