प्रशांत वनस्कर यांची विधी स्वयंसेवक म्हणून नियुक्ती

कणकवली
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि सचिव जिल्हा विधी सेवा प्रधिकरण सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती कणकवली तर्फे पोलीस स्टेशन कणकवली येथे विधी स्वयंसेवक म्हणून श्री प्रशांत भालचंद् वनस्कर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी दुर्बल घटकांना विधी सहाय्य मिळविण्या कामी मदत करण्यासाठी, प्रधिकरणामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी, पोलीस स्टेशन मधील लिगड क्लिनिक मध्ये हजर राहून दर आठवड्यातील प्रत्येक सोमवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत काम पाहण्यासाठी विधी स्वयंसेवक म्हणून कणकवली पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत वनस्कर यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे तालुका विधी सेवा समिती अध्यक्षांनी अधिकृत पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
या खेरीज पोलीस स्टेशन वैभववाडी येथे सुनील सखाराम कदम राहणार वागदे यांची विधी स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.