कणकवली नगरपंचायत च्या रियुज आणि रिसायकल सेंटर केंद्राची स्थापना

शहरवासीयांनी या उपक्रमात सहभागी व्हावे

प्रशासक जगदीश कातकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांचे आवाहन

  "मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर" अभियानांतर्गत  कणकवली नगरपंचायत कडून RRR केंद्राची स्थापना करण्यात आली असून स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 व माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, कपडे, पादत्राणे, प्लॅस्टीक आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करुन त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी रिडयूस, रियुज आणि रिसायकल सेंटर म्हणजेच RRR केंद्राची स्थापना करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उददेश आहे. सदर RRR केंद्र हे 20 मे 2023 ते 05 जुन 2023 या कालावधीत रोज सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यत जुनी नगरपंचायत इमारत येथे चालु करण्यात आले आहे. तरी आपल्याकडील जुनी पुस्तके, कपडे, पादत्राणे, प्लॅस्टीक आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करुन त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी आणून द्यावीत तसेच आपल्या संपर्कात कोणी गरजू व्यक्ती असल्यास त्याच्यापर्यंत हि माहिती पोहचवून सहकार्य करावे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा कणकवली नगरपंचायत  प्रशासक जगदीश कातकर व कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी अवधुत तावडे यांच्यावतीने करण्यात येत आहे.

संपर्क अमोल भोगले -9421235586

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!