सावंतवाडीत होणार २७ आणि २८ मे रोजी जिल्हास्तरीय खुल्या कॅरम स्पर्धा

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे आयोजन

नाव नोंदणीची अंतिम तारीख २४ मे २०२३

निलेश जोशी । कुडाळ : सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनची २०२३-२४ ची पहिली जिल्हास्तरीय मानांकन स्पर्धा दि २७ व २८ मे २०२३ रोजी कळसुलकर इंग्लीश स्कूल, सावंतवाडी येथे होणार आहे.या स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंनी आपली नाव तालुका प्रतिनिधींकडे २४ मे २०२३ पर्यंत द्यावीत असे आवाहन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
ही स्पर्धा जिल्हास्तरीय खुल्या गटात (पुरुष व महिला) खेळवण्यात येणार आहे. ह्या स्पर्धेमधे सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी सन २०२३-२४ चे जिल्हा खेळाडू नोंदणी शुल्क रु. १००/- व स्पर्धा प्रवेश फी रु १५०/- (१८ वर्षांखालील मुले/ मुली रु. १००/-) सह पुढील तालुका प्रतिनिधींकडे दि. २४ मे २०२३ पर्यत द्यायचे आहे. सावंतवाडी : श्री. राजेश निर्गुण, कुडाळ : श्री शुकाचार्य म्हाडेश्वर, वेंगुर्ला : श्री ओंकार कुबल, कणकवली : श्री पांडुरंग पाताडे, देवगड : श्री प्रकाश प्रभू.
स्पर्धकांनी असोसिएशनचे नाव व लोगो अरलेला पांढरा टी शर्ट व फूल पॅन्ट हा युनिफॉर्म घालून खेळणे अनिवार्य आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी योगेश फणसळकर (७६२०७५५७६६ ) यांच्याशी संपर्क करावा.

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!