परप्रांतीय मजूर कुटुंबातील मुलांमध्ये आढळली गोवर सदृश्य लक्षणे

सावंतवाडी तालुक्यातील बांदा ठिकाणी झोपडपट्टीतील मुलांचा समावेश;आरोग्य यंत्रणेत खळबळ

सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरातील आळवाडी येथे झोपड्या बांधून राहत असलेल्या परप्रांतीय मजूर कुटुंबातील ३ ते १० वयोगटातील ५ मुलांमध्ये गोवर सदृश्य लक्षणे आढळल्याने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. सद्यस्थितीत या परिसरात आरोग्य पथककडून सर्वेक्षण करण्यात आले असून अजून रुग्ण आढळून आले नाहीत. सिंधुदुर्गच्या माता बाल संगोपन अधिकारी सई धुरी यांनी आज या वस्तीला भेट देऊन माहिती घेतली. गोवर ही संसर्गजन्य साथ असल्याने स्थानिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन यांनी केले आहे.

error: Content is protected !!