आचरा येथे परप्रांतीय कामागरावर हल्ला?

आचरा येथे एका परप्रांतीय कामागराच्या डोक्यावर अज्ञाताने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. कामगाराला रक्तबंबाळ स्थितीत आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले. यावेळी पोलीस पथक आरोग्य केंद्रात आले होते. पोलिसांनी जखमी कामगाराचा जबाब घेतला असता त्याने आपली कोणाविरोधात तक्रार नसल्याचे म्हटले आहे. परप्रांतीय कामगार हा दारूच्या नशेत असल्याचे बोलले जात होते. तसेच जबाबातही विसंगत माहिती दिल्याने आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

error: Content is protected !!