सिंधुदुर्ग चे सुपुत्र मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांचे निधन

आज सायंकाळी होणार मुंबईत संस्कार
मुंबई चे माजी महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर यांचे आज निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व,पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी २वा. ठेवण्यात येणार आहे., त्यांनंतर दुपारी ४ वा.अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. विश्वनाथ म्हाडेश्वर हे मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुसबे – पोखरण येथील होते. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदी ते विराजमान झाले होते. तसेच आमदारकीची निवडणूक देखील त्यांनी लढवली होती., वैश्य, वाणी समाजाला जात पडताळणी च्या बाबतीत कायदेशीर लढ्यात त्यांनी काही वर्षांपूर्वी महत्त्वाची व मोठी भूमिका बजावली होती.
दिगंबर वालावलकर/ सिंधुदुर्ग





