कणकवलीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक

अपघातात दोघेजण गंभीर जखमी

सामंत इलेक्ट्रॉनिक चे मालक सतीश सामंत गंभीर

दोन दुचाकीची समोरासमोर धडक होत झालेल्या अपघातात कणकवलीतील सामंत इलेक्ट्रॉनिक्स चे मालक सतीश सामंत व समोरून धडक देणारा दुचाकीस्वार संतोष मोडक हे गंभीर जखमी झाले. मात्र सामंत यांच्या दुचाकीच्या मागे बसलेल्या किरकोळ दुखापत झाली. हा अपघात आज सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हरकुळ कसालकरवाडी फाट्यानजीक नरडवे रोडवर घडला. सामंत इलेक्ट्रॉनिक चे मालक सतीश सामंत हे आपल्या सोबत एकाला घेऊन हरकुळ च्या दिशेने जात होते. तर समोरून येणारे संतोष मोडक यांची दुचाकी सामंत यांच्या दुचाकीवर जोरदार आदळल्याचे समजते. त्यामुळे दोघांनाही जोरदार गंभीर दुखापत झाली. यात सामंत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजपा शहराध्यक्ष आण्णा कोदे, सुयोग टिकले, माधव शिरसाट, हरकुळ सरपंच बंडू ठाकूर, राजू पेडणेकर यांच्यासह अनेकांनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली होती.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!