मालडी येथे श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिन 13 मे 2023 रोजी

श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार 29 वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 13 मे 2023 रोजी मौजे धाकटी मालडी (तालुका मालवण) येथे श्री भावई देवी मंदिराच्या पटांगणात संपन्न होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सकाळी 9.00 वाजता श्री भावई देवीचा षोडोपचार पुजा व अभिषेक ,सकाळी 10.00 वाजता महाआरती, सकाळी 11.00
वाजता देवीची ओटी भरण्यास प्रारंभ, दुपारी 12.30 वाजता महा प्रसाद आरंभ, सायंकाळी 7 ते 9 स्थानिक ग्रामस्थांचे सुस्वर भजन आणि स्थानिक कलावंताचे करमणुकीचे कार्यक्रम तसेच रात्री 9.30 वाजता नाईक दशावतार नाट्य मंडळ, दोडामार्ग , यांचा साईदत्त समर्थ लीला ह्या दशावतार नाटकाचा प्रयोग भावई देवीच्या भव्य दिव्य रंगमंचावर होणार आहे.तरी सर्व ग्रामस्थ ,भावई भक्त ,मित्रमंडळी, हीतचिंतक,देणगीदार,आप्तेष्टांनी या होमहवन, महाआरती सोहळयाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मालडी ग्रामस्थांन तर्फे करण्यात आले आहे.

मसुरे प्रतिनिधी

error: Content is protected !!