JAXA JAPAN व NASA आयोजित KIBO-RPC स्पर्धेत युरेकाचे तीन विद्यार्थी भारतातफेऀ होणार सहभागी

KIBO Robot Programming Challenge (KIBO-RPC) हि Japan Aerospace Exploration Agency (JAXA) व National Aeronautics and Space Administration (NASA), the USA यांच्यातर्फे घेण्यात येणारी जागतिक स्पर्धा असून यामध्ये जगभरातील विद्यार्थी सहभागी होत असतात. ही स्पर्धा म्हणजे एक शैक्षणिक कार्यक्रमाचा भाग असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यावसायिक महत्वकांक्षा उच्च दर्जावर नेण्यास प्रोत्साहन मिळावे हा त्या मागचा उद्देश आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी युरेकाचे विद्यार्थी चैतन्य मोरजकर, समीहन पांगम व आर्यन गोरे यांची निवड करण्यात आली आहे . ते भारतातर्फे या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांना रोबोटिक्स क्षेत्रात कार्यरत असलेले युरेकाचे श्री भूषण पांगम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सहभागी विद्यार्थ्यांना सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग तसेच गणितातील अत्याधुनिक पद्धती शिकण्याच्या तसेच यामधील कौशल्य अद्यावत करण्याची संधी यामुळे सहज उपलब्ध होते.
जगभरातील इतर विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधून अद्यावत ज्ञान एकमेकांशी शेअर करण्यास यामुळे मदत होते.
आतापर्यंत अशा तीन स्पर्धा झाल्या असून यावर्षीची स्पर्धा जून ते ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. यातील पहिली फेरी ही ऑनलाइन असून ती जुलैमध्ये पार पडणार. यामध्ये सिम्युलेटर च्या सहाय्याने जावा या प्रोग्रामिंग लँग्वेज चा उपयोग करून विद्यार्थ्यांनी स्पेसची संबंधित दिलेल्या प्रॉब्लेम्स वर सोल्युशन शोधून काढायची आहेत. गेल्या वर्षी जगभरातील एकूण 351 टीम्स यामध्ये सहभागी झाल्या होत्या
यातून निवडलेल्या टीमची अंतिम फेरी Tsukuba Space Center , Tsukuba, जपानमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार आहे.
यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतः बनवलेल्या प्रोग्रामच्या सहाय्याने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधील रोबोटकडून दिलेले Task पूर्ण करण्यासाठी आपले प्रोग्रामिंग कौशल्य पणाला लावावे लागणार आहे.