खोत जुवा येथे ५ मे रोजी २०-२० भजन डबलबारी

श्री देव मशेश्वर देवस्थान मसुरे खोत जुवा येथे दिनांक 5 मे रोजी श्री सत्यनारायण महापूजा व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शुक्रवार दिनांक 5 मे रोजी सकाळी नऊ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा,
दुपारी बारा वाजता आरती तीर्थप्रसाद महाप्रसाद, दुपारी एक वाजता महाप्रसाद भंडारा, सायंकाळी पाच वाजता श्री देव जैन भरतेश्वर देवस्वारी आगमन आणि श्री देव मशेश्र्वर आणि 360 खेड्यांचा अधिपती मसुरे ग्रामदैवत कसबा मसुरे श्री देव जैन भरतेश्वर राजा यांचा अभूतपूर्व भेट सोहळा आणि रात्री दहा वाजता डबल बारी भजन सामना बुवा श्री संतोष जोईल श्री भुतेश्वर प्रसादिक भजन मंडळ देवगड, गुरुवर्य श्रीधर बुवा मुणगेकर यांचे शिष्य, पखवाज शाम तांबे विरुद्ध बुवा श्री उदय पारकर ,श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ कासार्डे कणकवली, गुरुवर्य बुवा दीपक चव्हाण यांचे शिष्य, पखवाज नागेश लाड यांच्यामध्ये २०-२० भजन डबलबारी चा सामना होणार आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवड समस्त खोत बांधव मसुरे यांनी केले आहे. या वेळी मोफत होडीची व्यवस्था केलेली आहे.

मसूरे प्रतिनिधी

error: Content is protected !!