जिल्हास्तरीय ज्युनिअर फेन्सिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अमरावती येथील राज्यस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्गचा संघ होणार सहभागी

महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशनच्या वतीने कणकवली येथे जिल्हास्तरीय ज्युनिअर गट फेन्सिंग निवडचाचणीसाठी स्पर्धेचे आयोजन मंगळवार,दि. ८ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.
हि निवडचाचणी कणकवली येथील नगरवाचनालय हॉल मध्ये आयोजित केली होती. या स्पर्धेचे उदघाट्न तालुका क्रीडा अधिकारी प्रविणा वानखेडे यांच्या हस्ते झाले. यावेळी फेन्सिंग अससोसिएशनचे अध्यक्ष अच्युतराव वणवे, सचिव एकनाथ धनवटे, खजिनदार सुदिन पेडणेकर, कळसुली इंग्लिश स्कूल चे पर्यवेक्षक संजय सावळ, नॅशनल इंग्लिश स्कूल नडगीवेचे अभय तावडे, पंच अंकुर जाधव, आरोही ठाकुर, ऋतुजा शिरवलकर, साहिल बाईत, कुणाल नारकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.फॉईल मुली – प्रथम स्वरा महाडेश्वर, द्वितीय गार्गी सावंत, तृतीय जिया तळगावकर, व ज्ञानपरी ठोंबरे.
फॉईल मुले- प्रथम ओम सुतार, द्वितीय ओंकार घाडीगावकर.
सेबर मुली- प्रथम वैष्णवी कदम, द्वितीय -आराध्या पाटणकर, तृतीय – प्रांजल अपराज यांनी या स्पर्धेत यश मिळवले आहे. या सर्व खेळाडूंची
निवड दि.११ ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनिअर गट फेन्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे सचिव व प्रशिक्षक एकनाथ धनवटे, अंकुर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अच्युतराव वणवे ,खजिनदार सुदिन पेडणेकर यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!