पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा प्लॅस्टिक वापर टाळा-सरपंच जेरॉन फर्नांडिस

या गणेशोत्सवात व्यावसायिकांनी प्लॅस्टिकचा वापर कमी करुन पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी केले.यावेळी त्यांनी उपस्थित विद्यूत मंडळ अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावत वीज समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना केली.

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा आठवडा बाजाराच्या अनुषंगाने आणि संपूर्ण गणेशोत्सवात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना बाबत ग्रामपंचायत आचरा च्या पुढाकाराने ग्रामपंचायत सभागृहात पोलीस प्रशासन,व्यापारी संघटना पदाधिकारी, रिक्षा संघटना, विद्युत मंडळ आदींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी प्लॅस्टिक वापर टाळण्याचे आवाहन केले.यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले,आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर उपाध्यक्ष परेश सावंत,मंदार सांबारी, जयप्रकाश परुळेकर ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर,चंदू कदम,पुर्वा तारी, सायली सारंग,विद्यूत मंडळाचे सहाय्यक अभियंता शिंदे, कर्मचारी पिंट्या साळकर, मंगेश परब, तसेच इतर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी,रिक्षा. संघटनेचे संजय आचरेकर, श्रीपाद वायंगणकरं, मिराशी, भाटकर ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब यांसह अन्य आदी उपस्थित होते. या बैठकीत गणेशोत्सवात आचरा तिठ्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तिठा येथे होमगार्ड सोबत पोलीसही तैनात करणे, वाहतूकीस अडथळा होईल असे बोर्ड बाबत व्यापाऱ्यांना सुचना करणे,यांसह एसटी बस थांब्याजवळ खाजगी वाहने पार्क न करण्याबाबत दक्षता घेणे आदी बाबींवर या बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.

error: Content is protected !!