अजितदादा पवार यांच्या आठवणी व कामाचा अनुभव महाराष्ट्र विसरणार नाही!

आमदार दीपक केसरकर यांचे प्रतिपादन

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा

अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 22 जुलै ते 1 ऑगस्ट महा आरोग्य सेवा अभियान शिबिराचा शुभारंभ

माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सूचनेनुसार महाराष्ट्र शासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवा साप्ताह अंतर्गत राबविण्यात येणारे महाआरोग्य सेवा अभियान हे 22 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या अभियानातर्फे सर्व सामन्य नागरिकांना डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी, विविध आजारांचे निदान, जनजागृती, आवश्यक तपासण्या, उपचारासाठी मार्गदर्शन, तसेच शस्त्रक्रिया या सर्व गोष्टी मोफत जनतेसाठी करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने या महा आरोग्य सेवा अभियान शिबिराचे 22 जुलै रोजी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे या शिबिराचे उदघाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, आदी उपस्थित होते. यावेळी स्तब्ध राहून स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यात आले. शिबिराची प्रस्तावना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ. अनंत दवगे यांनी केली. आमदार दीपक केसरकर यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्व. अजितदादा यांच्या जयंती निमित्त घेण्यात येणार्‍या शिबिराचा जनतेने लाभ घ्यावा लोकानी आरोग्य तपासणी करून निदान करावे असे आवाहन केले. अजित दादा हे राज्यातील लोकप्रिय नेते होते त्यांचा प्रशासकीय काम करण्याचा फार मोठा अनुभव होता अजित दादा अर्थमंत्री असताना आपण त्या खात्याचे राज्यमंत्री होतो अजित दादांनी विधानपरिषद सभागृहात आपल्याला अर्थसंकल्प सादर करायची संधी दिली होती. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, डॉ. श्रीपाद पाटील,सावळाराम अनावकर यांनीही मनोगते व्यक्त केली.

error: Content is protected !!