कणकवली मध्ये अजितदादा पवार यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस कडून साजरी

अजितदादांच्या स्मृतीस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्यकर्त्यांनी केले अभिवादन
कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कणकवली येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अजित दादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर,राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर्,शहर उपाध्यक्ष सचिन अडुळकर,जिल्हा सचिव सतीश पाताडे, तालुका सचिव सत्यविजय परब,मुश्ताक काझी, सईद काझी, हानीफ काझी, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, बाळू मेस्त्री, साईल सुतार आदी उपस्थित होते.






