कर्ज पुरवठ्यासाठी बँक ऑफ इंडिया कटिबद्ध – शिबप्रसाद बिस्वाल

सावंतवाडीत बँक ऑफ इंडिया तर्फे किसान महोत्सवाचे आयोजन
शेतीसह इतर विविध सर्व योजनांसाठी कर्ज देण्यासाठी बँक ऑफ इंडिया नेहमीच कटिबद्ध राहील. अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे असे प्रतिपादन महाप्रबंधक, प्रधान कार्यालय मुंबईचे शिब प्रसाद बिस्वाल यांनी सावंतवाडी येथील किसान मेळाव्यात केले. यावेळी अनेक महिला बचतगट, वैयक्तिक लाभार्थ्यांना कृषिविषयक सुमारे विविध व्यवसायासाठी कोटीची कर्ज मंजूर पत्रे देण्यात आली.
बँक ऑफ इंडियाच्या वतीने किसान समृद्धी महोत्सव अंतर्गत किसान महोत्सवाचे आयोजन सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर येथील सभागृहात करण्यात आले होते या किसान महोत्सवाचे उद्घाटन श्री बिस्वाल यांच्या हस्ते आंचलिक प्रबंधक, रत्नागिरी अंचल नरेंद्र देवरे, उप आंचलिक प्रबंधक, रत्नागिरी अंचल अंजनी कुमार सिंह आजाद , जिल्हा अग्रणी प्रबंधक ऋषिकेश गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी उमेदचे जिल्हा समन्वयक नीलेश वालावलकर पंचायत समिती सावंतवाडी कृषी अधिकारी शारदा नाडेकर ,माविमच्या वैष्णवी नाईक, मिताली राऊळ, बँक ऑफ इंडिया वरिष्ठ शाखाधिकारी विनायक नार्वेकर, एसकेव्हिके प्रमुख कणकवली राजाराम परब, आरसेटी संचालक किशोर रोडी तसेच सावंतवाडी तालुक्यातील बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना श्री बिस्वाल म्हणाले, तळागाळातील महिलांचे विविध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण झाले पाहिजे. किसान महोत्सवाच्या माध्यमातून महिलांसाठी शेती विषयक विविध योजना असून त्याचा लाभ महिलांनी घेऊन या योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे असे सांगितले श्री देवरे यांनी महिलावर्ग शेतीतून उत्कर्षाकडे गेला पाहिजे यासाठी एसएचजी व मुद्राच्या माध्यमातून कर्जाच्या विविध योजना आहेत या योजनांचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे बँक ऑफ इंडिया नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे. या भागातील महिला व पुरुष कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड करण्यामध्ये जो प्रामाणिकपणा दाखवतात तो निश्चितच कौतुकास्पद आहे. भविष्यातही विविध उपक्रम साठी कर्ज घ्या त्याची योग्य कालावधीत परतफेड करून पुन्हा कर्ज घ्या असे सांगितले. जिल्हा अग्रणी श्री गावडे यांनी किसान महोत्सव अंतर्गत बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून अन्न व कृषी प्रक्रिया युनिट, मत्स्य, दुग्ध व कुक्कुट पालन, आत्मनिर्भर भारत योजना किसान केर्डिट कार्ड, पॉली व ग्रीन योजना ,कृषी वाहन ,कृषी यांत्रिकीकरण याबाबत विस्तृत मार्गदर्शन करत महिलासाठी शेतीविषयक विविध योजना सागून सर्व महिला शेतीमध्ये स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत असे सांगितले. श्री आझाद यांनी आपला सिबिल चांगला ठेवा मोबाईलवरुन होणाऱ्या कोणत्याही अमिषाला बळी पडू नका असे सांगितले. श्री वालावलकर यांनी सुद्धा मागदर्शन केले. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील विविध महिला बचत गट वैयक्तिक लाभार्थी यांना सुमारे कोटी रुपयाचे कर्ज मंजुरीची पत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरसेटी संचालक किशोर रोडी यांनी केले आभार बँक ऑफ इंडिया सावंतवाडी शाखाधिकारी विनायक नार्वेकर यांनी मानले.






