पाट हायस्कूलमध्ये कृषी दिनानिमित्त सीडबॉलचे वाटप

कृषी दिनाचे औचित्य साधून पाट हायस्कुल मध्ये सिडबॉलचे वाटप करण्यात आले. कृषी दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे आपली धरती सुजलाम सुफलाम व्हावी याकरिता मुलांच्या मनात प्रेरणा निर्माण करून विविध सीडबॉलचे निर्मिती करण्यात आली. चिंच, फणस, चारा, काजू आणि इतर वन्य वनस्पतींच्या बियांपासून सिडबॉल तयार करून कृषी दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी विद्यालयात मानद वन्यजीव रक्षक कु भाग्यश्री कृष्णा परब, श्री विष्णू लक्ष्मण मसके अध्यक्ष वाइल्ड लाईफ रेशक्युअर सिंधुदुर्ग, श्री सिद्धेश सगुणदास ठाकूर उपस्थित होते. तर मुख्याध्यापक सयाजी बोंदर सर, पर्यावरण हरित सेना प्रमुख संदीप साळसकर, जि प सदस्या यज्ञा साळगावकर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक आणि इतर शिक्षक उपस्थित होते. संस्थेतर्फे या उपक्रमातील विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी भाग्यश्री परब, मसगे सरांनी मुलांना मार्गदर्शन केले.






