राष्ट्रीय फलोद्यान मंडळावर “स्नेहसिंधु” चे संदीप राणे!

केंद्र सरकारच्या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड अर्थात राष्ट्रीय फलोद्यान मंडळाच्या सदस्य पदी अशासकीय सभासद म्हणून स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ तसेच अन्य अनेक उपक्रमातून कार्यरत असलेले कृषी क्षेत्रातील अग्रणी संदीप यशवंत राणे यांची निवड करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय फलोद्यान मंडळावर केंद्र सरकार तीन वर्षांकरिता 16 अशासकीय सभासद नेमते. त्यानुसार संदीप राणे यांची ही अभिनंदन करण्यात आली आहे 

संपूर्ण देशातील फलोद्यान विषयक समस्या, त्यावर उपाय आणि एकूणच व्यवस्थापन या संदर्भातील देश पातळीवरील निर्णय या राष्ट्रीय फलोद्यान मंडळाच्या मार्फत घेतले जातात. शासनाच्या अनेक कृषी योजना असतात. त्यातील पाच हेक्टर पेक्षा अधिक जागे करीता असलेले मोठ्या बजेटचे प्रकल्प या मंडळामार्फत राबविले जातात. प्रोसेसिंग युनिट, सूतगिरण्या सारख्या मोठ्या प्रकल्पांना मूर्त स्वरूप या राष्ट्रीय फलोद्यान मंडळाच्या माध्यमातून दिले जाते .

संदीप राणे यांनी यापूर्वी दोन वेळा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार परिषद सदस्य, वनशास्त्र महाविद्यालय दापोलीचे बोर्ड ऑफ स्टडी मेंबर म्हणून लक्षणीय काम केलेले आहे. संदीप राणे हे स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ, सिंधुदुर्ग विज्ञानभारतीचे जिल्हा संयोजक, विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा समितीचे राज्य संयोजक म्हणून कार्यरत आहेत.
संदीप राणे यांच्या केंद्रीय पातळीवरील या निवडीने कोकणात आनंद व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!