पालकमंत्री श्री.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयडियल स्पेशल स्कूलमध्ये खाऊ वाटप

कणकवली : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयडियल स्पेशल स्कूल येथे “विशेष विद्यार्थ्यांसोबत” आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यानिमित्त विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला.सामाजिक बांधिलकी जपत आणि विशेष मुलांप्रती प्रेम व आपुलकी व्यक्त करत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले.वाढदिवस साजरा करण्याची ही आगळीवेगळी संकल्पना सर्वांच्या पसंतीस उतरली.
या प्रसंगी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,सेक्रेटरी श्री.हरिभाऊ भिसे,मुख्याध्यापिका सौ. अर्चना देसाई,कोऑर्डिनेटर श्री.निलेश घेवारी,स्पेशल स्कूलच्या कोऑर्डिनेटर सौ.मंजिरी घेवारी,श्री.पाताडे सर,प्रभू सर,कदम सर, शिंगाडे मॅडम, सौ.सावंत मावशी तसेच इतर कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी पालकमंत्री मा.श्री.नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, यशस्वी व दीर्घायुषी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.विशेष विद्यार्थ्यांच्या सहवासात साजरा झालेला हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरला आहे.

error: Content is protected !!