ओसरगाव माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांची ठाकरे शिवसेनेच्या कळसुली विभाग प्रमुख पदी निवड

जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली नियुक्ती जाहीर
माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते बबली राणे यांचा सत्कार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कळसुली विभाग प्रमुख पदी माझी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती केली आहे. आज या नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्यासह बबली राणे प्रमोद कावले, प्रदीप तळेकर, नितीन धुरी बबन देसाई दशरथ शिंदे बंड्या भुजबळ दिलीप तळेकर पांडुरंग शिंदे यशवंत चव्हाण प्रकाश परब मुरलीधर परब महादेव राठवड प्रमोद सावंत राजू राणे रवी परब अनंत राणे रवी सावंत शिरीष घाडीगावकर व विभागातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.





