कुडाळ नगरपंचायतीत उद्या ‘एकल महिला दिवस’

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या निर्देशानुसार २३ जून, २०२६ रोजी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात ‘एकल महिला दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त एकल महिलांसाठी (विधवा निराधार) शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार असून, एकल महिलांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेऊन राज्याच्या प्रस्तावित एकल महिला धोरणासाठी अभिप्राय संकलित केला जाणार आहे. शहरातील सर्व एकल महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ नगरपंचायतीने केले आहे





