पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १२ हजार भाजीपाला रोपांचे मोफत वाटप

जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे व हरकुळ खुर्द भाजपाच्या वतीने आयोजन
महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांच्या माध्यमातून हरकुळ खुर्द व भिरवंडे गांधीनगर येथे भव्य भाजीपाला रोप वाटप उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत हरकुळ खुर्द व भिरवंडे गांधीनगर येथे सुमारे ६५० कुटुंबांना तब्बल १२ हजार भाजीपाला रोपे मोफत वितरित करण्यात आली. ग्रामीण भागात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी, प्रत्येक कुटुंबाने स्वतःच्या परसबागेत ताजा व रसायनमुक्त भाजीपाला पिकवावा तसेच घरगुती पोषणमूल्य वाढविण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी हरकुळ खुर्द येथे माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत,जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, सरपंच राजन रासम, उपसरपंच सर्वेश दळवी,सोसायटी चेअरमन धोंडी रासम,महेंद्र डीचवलकर,संजय रावले,शक्ती केंद्रप्रमुख राजा डीचवलकर,अविनाश रासम ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग रासम,महेश दळवी,शंकर घाग,तंटामुक्ती अध्यक्ष समीर सावंत, बूथ अध्यक्ष आशू रासम,श्यामसुंदर रासम, संतोष हुले व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच भिरवंडे गांधीनगर येथे उपसरपंच राजेंद्र सावंत,माजी सरपंच शेखर सावंत,पत्रकार आबा सावंत, तुषार सावंत,ग्रामपंचायत सदस्य सुनिता सावंत,प्रसन्न सावंत,विनिता सावंत,मंजुषा बोभाटे,बचत गट अध्यक्षा सीमा सावंत,भाजपा सोशल मीडिया प्रमुख सुधीर सावंत,बाबाजी सावंत, रघुनाथ सावंत,दिगंबर गावडे,माजी सरपंच शांती मेस्त्री,सदानंद सावंत हेमंत सावंत,अनिता सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते.





