माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांनी पालकमंत्री यांची भेट घेत दिल्या शुभेच्छा

मुंबई येथील सुवर्णगड या निवासस्थानी घेतली भेट
राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची त्यांच्या मुंबई येथील सुवर्णगड या निवासस्थानी भेट घेत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत माझी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत राज नलावडे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात असताना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये मुंबईतील सुवर्णगड या निवासस्थानी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.





